कोऽहं!
आस्तिक्य किंवा नास्तिक्याविषयी विचार करताना एकंदर माझ्या असे लक्षात येते की एखाद्या व्यक्तीचे नास्तिक असणे हे आस्तिकांना तर खटकतेच, पण नास्तिकांना तिच्या नास्तिकपणाच्या खरेपणाविषयी येताजाता टिका करणे, त्याहून जास्त आवडते. ‘नास्तिक म्हणवते आणि हिच्याकडे देवघर आहे’ ‘नास्तिक म्हणवते आणि ही दररोज दारात रांगोळी काढते’ ‘नास्तिक म्हणवते आणि ही दिवाळीला दिवे लावते’ ‘नास्तिक म्हणवते आणि ही …